Mundhwa : दुचाकीवरून पाठलाग करत तरुणीला दाखवला अश्लील व्हिडिओ

एमपीसी न्यूज- दुचाकीवरून निघालेल्या तरुणीचा पाठलाग करून एका अज्ञात तरुणाने तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवला. त्यानंतर या तरुणाने स्पर्श करून तिचा विनयभंग केला. ही घटना मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडली.

या प्रकरणी एका 25 वर्षीय तरुणीने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी एका प्रसिद्ध कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करते. घटनेच्या दिवशी ती आपल्या दुचाकीवरून कार्यालयात जाण्यासाठी निघाली होती. वाटेत सिग्नलवर तिच्या दुचाकीचा वेग कमी होताच पाठीमागून दुचाकीवरून पाठलाग करीत येणाऱ्या तरुणाने तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवला. तसेच तिच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केला.

घाबरलेल्या तरुणीने दुचाकीवरून तेथून पळ काढला. मुंढवा पोलीस आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधित तरुणाचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.