Pune : डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर गुरुवार ऐवजी शुक्रवारी अंत्यसंस्कार

एमपीसी न्यूज- ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे मंगळवारी (दि. 17) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी (दि. 19) ऐवजी शुक्रवारी (दि. 20) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याबाबत ज्येष्ठ अभिनेत्या आणि डॉ. लागू यांच्या पत्नी दीपा श्रीराम यांनी रूपवेध प्रतिष्ठानतर्फे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, डॉ. लागू यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी (दि. 19) अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र डॉ. लागू यांचा अमेरिकेत राहणारा मुलगा गुरुवार पर्यंत पुण्यात पोहोचू शकत नसल्यामुळे उद्या गुरुवार ऐवजी शुक्रवारी (दि. 20) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सकाळी 10 ते 11 या वेळेत डॉ. लागू यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी बालगंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.