Pimpri Corona Update : रविवारी शहरात 127 नवीन रुग्ण; 234 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात आज (रविवारी, दि. 12) दिवसभरात 127 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 234 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दिवसभरात दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात कोरोनाबाधितांची आजवरची संख्या 2 लाख 71 हजार 576 एवढी झाली आहे. तर आजवर 2 लाख 66 हजार 757 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

रविवारी शहराबाहेरील एक तर शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजवर कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील 4 हजार 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात एक हजार 139 रुग्ण सक्रिय आहेत. त्यातील 572 जणांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 567 जणांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी पालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रांवर 21 हजार 754 नागरिकांचे लसीकरण झाले. आजवर शहरातील 16 लाख 32 हजार 548 जणांनी लस घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.