-MPC-TOP-MOST-BANNER-I

Chakan : दुचाकीस्वाराने घेतला वाहतूक पोलिसाच्या बोटाला चावा

ट्रॅफिक वॉर्डन आणि होमगार्डसह दोन वाहतूक पोलिसांना मारहाण

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – लहान मुलाला धडक देऊन भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराला ट्रॅफिक वॉर्डन आणि होमगार्ड यांनी अडविले. यावरून दुचाकीस्वाराने महिला वाहतूक पोलीस, ट्रॅफिक वॉर्डन आणि होमगार्ड यांना मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या वाहतूक पोलिसाच्या बोटाला चावा घेऊन जखमी केले. याप्रकरणी दुचाकीस्वाराला अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 19) दुपारी साडेतीनच्या सुमारास नाणेकरवाडी, चाकण येथे घडली.

सिद्धलिंग भगीरथ मोठे (वय 31, रा. शिवाजीनगर, मोशी) असे अटक केलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी चाकण वाहतूक शाखेच्या महिला पोलीस नाईक स्मिता साहेबराव गाढवे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 19) दुपारी साडेतीनच्या सुमारास दुचाकीवरुन जाणाऱ्या आरोपी सिद्धलिंग याने नाशिक-पुणे रोडवर नाणेकरवाडी येथे एका मुलाला धडक दिली. यामध्ये लहान मुलगा जखमी झाला. त्यावेळी आसपासच्या नागरिकांनी सिद्धलिंग याला चोप देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिथे कर्तव्यावर असलेल्या ट्रॅफिक वॉर्डन पोटवडे आणि होमगार्ड भोकटे यांनी सिद्धलिंग याला नागरिकांच्या तावडीतून सोडवून ट्राफिक चौकीकडे घेऊन गेले.

ट्रॅफिक चौकीकडे जात असताना आरोपी सिद्धलिंग याने ट्रॅफिक वॉर्डन आणि होमगार्ड यांच्याशी हुज्जत घालून हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी स्मिता यांच्या पाठीत लाथ मारली. त्यानंतर भांडणे सोडविण्यासाठी आलेले पोलीस कॉन्स्टेबल मराडे यांच्या बोटाला चावा घेऊन जखमी केले. याबाबत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सिद्धलिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.