Pune : डुकरे पकडण्याच्या कारवाईविरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा इशारा

; कारवाईत हस्तक्षेप करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन

एमपीसी न्यूज- पुणे, पिंपरी-चिंचवड मधील डुकरे पकडण्याच्या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध आत्मदहन करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम आणि डुक्कर पालन व्यवसाय मालक मंचाने दिला आहे. डुकरे पकडण्याची कारवाई नियमांना धरून नसल्याने कारवाईत हस्तक्षेप करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम, सुजित हांडे, गणेश जोशी, दीपक तुसम, दीपक सोधे, विकी कीर यांनी हे निवेदन दिले आहे.

पुणे आणि पिंपरी -चिंचवड मधील डुकरे पकडण्याची कारवाई बेकायदेशीर,अनिमल वेल्फेअर बोर्डाने ठरवून दिलेल्या निकषानुसार होत नाही, पकडलेली डुकरे कर्नाटकात सोडण्यास कर्नाटक राज्याची परवानगी नसणे आणि डुक्कर पालन व्यावसायिकांची गळचेपी करण्याच्या निषेधार्थ मंत्रालय पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका येथे शंभर व्यावसायिक आत्मदहन करणार आहेत, असा इशारा निलेश निकम दिला आहे. डुक्कर व्यवसाय मालक संघ संवैधानिक मार्गाने पालिकांच्या डुकरे पकडण्याच्या कारवाईला विरोध करीत आहे

डुकरे पकडण्याची कारवाई नियमांना धरून नसल्याने कारवाईत हस्तक्षेप करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. डुकरे पकडण्याचा आणि ठेकेदारला काम देण्याचा कोणताही ठराव पालिकांमध्ये झालेला नाही. ठेकेदार निवडताना आजारी डुकरे पकडणे असे कारण दाखविण्यात आले आहे पकडलेली डुकरे आजारी होती याचे पुरावे पालिका सादर करणार का? आजारी डुकरे कर्नाटक राज्यात आणण्यास त्या राज्याने परवानगी दिली आहे का ? असा सवाल निकम यांनी विचारला आहे. डुकर पालन करणारे व्यावसायिक भटक्या विमुक्त समूहाचे असून ,पिढीजात व्यवसाय करीत असून शेती पूरक व्यवसाय म्हणून त्याला मान्यता आहे. पुणे शहर विकसित होण्याआधीपासून हे व्यावसायिक डुकरे पालनाचा व्यवसाय करीत आहेत. ही कारवाई उच्च न्यायालय आणि एनिमल वेल्फेअर बोर्डाने घालून दिलेले निकष पाळत नसल्याने अवैध ठरत आहे त्यामुळे ती थांबवावी असे मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेल्या निवेद्नानात म्हटले आहे.

पशु संवर्धन विभागाचे प्रभारी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्याच्या मुख्य सचिवांच्या मार्फत या विषयाची चौकशी करून तोडगा काढू असे आश्वासन दिल्याची माहिती निलेश निकम यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.