Bhosari : संत निरांकरी मिशनच्या रक्तदान शिबिरात 732 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज – संत निरांकरी मिशनच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 732 जणांनी रक्तदान केले. हे शिबिर गुरुवारी (दि. 27) भोसरी मधील संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे पार पडले.

रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रीमल सिंह, सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे झोन प्रमुख ताराचंद करमचंदानी उपस्थित होते. संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या पुणे झोनच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय रक्तपेढी, औंध रुग्णालय रक्तपेढी यांनी रक्त संकलन केले.

अवकाळी पावसानंतर शहरामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढले. त्यामुळे पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नोव्हेंबर महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवत होता. त्यावेळी संत निरंकारी मिशनच्या 41 स्वयंसेवकांनी रुग्णालयात जाऊन स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. रक्तदान शिबिरानंतर सायंकाळी सहा ते आठ या वेळेत आध्यात्मिक सत्संग झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.