Kalewadi : भाग्यवंती देवी मित्र मंडळाच्या रक्तदान शिबिरात 35 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज- भाग्यवंती देवी मित्र मंडळाच्या वतीने गुरुवारी (दि. 26) कोकणेनगर ,काळेवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 35 जणांनी रक्तदान केले.

_MPC_DIR_MPU_II

रक्तदान शिबिराचे आयोजन भारतीय वायुदल सैनिक राहुल पाटील यांच्यामार्फत करण्यात आले होते. विद्याश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या ओम ब्लड बँकतर्फे रक्त संकलित करण्यात आले. यावेळी डॉ. मयूर पाटील व डॉ.सायली नागरे उपस्थित होत्या.

शिबिर यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार, मंडळाचे विनायक राजगुरू, आकाश सगर, अन्सार मुल्ला, राहुल पवार, विनायक श्रीवास्तव, अक्षय साळे, राजदीप साबळे, शानु ,.रुद्रा यांनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.