Akurdi : अस्सल चवीचा वारसा जपणाऱ्या ‘देशी कट्टा’ ला आता द्यायची आहे फ्रँचायझी

(अश्विनी जाधव)

एमपीसी न्यूज- ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्यासाठीची जर चढाओढ लागली तर कॉम्पिटिशन बरीच टफ असेल🤭 हो कारण प्रत्येक जण या ना त्या कारणाने ऑनलाइन जेवण ऑर्डर करतच असतो. मीही त्यातलीच एक आहे. परंतु कधी कधी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पदार्थांचा आस्वाद घेण्याचा अनुभव वेगळाच असतो. कारण तिथले वातावरण, गरमागरम पदार्थ या गोष्टींमुळे तिथे जेवण्यामध्ये वेगळीच मजा येते. आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळच्या देशी कट्टामधून मी अनेकदा ऑनलाईन जेवण ऑर्डर केले आहे. मात्र या ठिकाणी भेट देण्याची अनेक दिवसांपासूनची इच्छा नुकतीच पूर्ण झाली. देशी कट्टाच्या ओनर हर्षदा मॅडम यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला. आता ‘देशी कट्टा’ जास्तीतजास्त खवय्या मंडळींपर्यंत पोहोचण्यासाठी शहरात विविध भागात फ्रॅन्चायजी सुद्धा देणार आहे.

बाहेर जाऊन कितीही खादाडी केली तरीही मोकळ्या वेळेत आणि कंटाळा आला की ऑनलाइन काहीना काही ऑर्डर करतच असते. चव आवडल्यामुळे अनेक वेळा जेवण ऑर्डर केलंय ते आकुर्डी रेल्वे स्टेशन जवळच्या देशी कट्टा मधून. परवाच्या रविवारी ‘देशी कट्टा’ला प्रत्यक्ष भेट दिली. हॉटेल बऱ्यापैकी मोठं आणि सुटसुटीत होतं. जास्त आवडलेली गोष्ट होती ती म्हणजे आमचं हसून केलं गेलेलं स्वागत… होय, देशी कट्टाच्या ओनर स्वतः सगळ्यांशी बोलत होत्या… कोणाला काय हवय-नकोय ते बघत होत्या. हसतमुख चेहऱ्याने त्या सर्वांशी शांतपणे बोलत होत्या. आम्ही मस्तपैकी जेवण ऑर्डर केलं. आम्ही जेवण करत असतानाही एक दोनदा येऊन आमच्याशी बोलून गेल्या. म्हणून जाताना मुद्दाम आवर्जून त्यांना भेटायला गेलो. दुपारची गर्दी कमी झाल्यामुळे त्या थोड्या निवांत दिसल्या. मी त्यांना सांगितलं की त्यांच्याजवळ आतापर्यंत ऑनलाइन मागत होते पण आज पहिल्यांदाच इथे येऊन जेवलीये… तर खुश होऊन म्हणाल्या आधी आली असतीस तर थोडी आधी ओळख झाली असती. बरं रबडी खाऊन पाहिलीस का इथली.. special असते. आवडेल. मग काय नेकी और पुछ पुछ 🤭🤪 आम्ही लगेच सगळ्यांसाठी रबडी ऑर्डर केली. हर्षदा मॅडम ही बसल्या आमच्या सोबत.

हर्षदा मॅडमच बोलणं अतिशय लाघवी आणि छान. .. आपसूकच गप्पांचा फड रंगला मस्त टेस्टी रबडी सोबत.. मी सहज विचारलं त्यांना, “या व्यवसायात कशा काय आलात ??” तर त्यावर त्यांचं जे उत्तर आलं ना त्याने आम्ही सगळेच आश्चर्यचकित झालो. त्यांचं इंजिनियरिंग झालेलं असून काही वर्ष त्यांनी आयटी क्षेत्रात जॉब देखील केलेला आहे. हे ऐकून कोणाला आश्चर्य वाटणार नाही ? उठता उठता आम्ही परत खाली बसलो. साहजिकच त्यांना विचारलं तुम्ही इंजिनिअरिंग केलंय मग हॉटेल व्यवसाय कसा काय चालू केलात? त्यांचंही खरंच आहे म्हणा… आपल्या शिक्षणाचा आणि आपल्या आवडीनिवडींचा मेळ बसण तसं अवघडच असतं. माझ्या हाताला असलेली चव आणि मनातली स्वयंपाकाची आवड मला या व्यवसायात घेऊन आली. घरचेही मला नेहमी म्हणायचे तुझ्या हाताला खरंच खूप छान चव आहे. तू जॉब करण्यापेक्षा हॉटेल चालू कर… तुझं मन तिथेच रमेल. आणि मग शेवटी चार वर्षांपूर्वी घेतला निर्णय आणि दिला जॉब सोडून.. आणि तेव्हाच चालू झाला हा देशी कट्टा.

देशी कट्टाला अगदी पहिल्या दिवसापासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. आधी स्नॅक्स मग प्युअर व्हेज म्हणून पदार्पण केले पण लोकाग्रहास्तव पुढील एक- दोन महिन्यातच नॉनव्हेज देखील चालू केले. हर्षदा मॅडम स्वतः जळगावच्या असल्यामुळे वऱ्हाडी आणि खान्देश स्पेशल हा सेगमेंट अर्थातच महत्त्वाचा होता. अल्पावधीतच देशी कट्टा त्याच्या या दोन्ही जेवणासाठी प्रसिद्ध झाला. हळू हळू पंजाबी, कबाब, चायनीज इत्यादी पण चालू केले. नॉनव्हेज हे काळ्या मसाल्या मध्ये #वऱ्हाडी_स्टाइल मध्ये मिळते. मसाला अर्थात मॅडम अजूनही स्वतः बनवतात. हळू हळू देशी कट्टा त्याच्या चवीसाठी लोकांच्या चर्चेत येत गेलं आणि प्रसिद्धीच्या झोतात येत गेलं. आता यशस्वी 4 वर्ष पूर्ण झालियेत. कधीही मागे वळून बघायची गरजच पडली नाही. देशी कट्टा चालू झाल्याच्या पुढील 7-8 महिन्यातच मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अजून जागा वाढवली. मिळालेल्या यशामुळे हर्षदा मॅडम मनापासून समाधानी आहेत आणि ते त्यांच्या चेहेऱ्यावर दिसतही होतं.

“देशी कट्टाची चव आता सगळ्यांना माहिती झाली आहे आणि आवडली पण आहे. मला आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी विचारलं ही आहे आणि आता मी #Franchise देणार आहे. आता मी Franchise देण्यासाठी सगळी कागदपत्रं ही तयार करून घेतली आहेत. लवकरच ही प्रोसेस ही पूर्ण होईल आणि अजून एक देशी कट्टा समोर येईल आणि अस्सल चवीचा हा वारसा असाच अविरतपणे चालू राहील” असेही त्यांनी जाता जाता सांगितले.

खुप छान वाटलं त्यांच्याशी बोलून… कष्ट अर्थातच आहेतच.. पण त्याच बरोबर गरजेचं आहे तुमचा संयम. या व्यवसायाकरिता संयम असणं आणि तो टिकवून ठेवणं खूप गरजेचं आहे. लवकरच देशी कट्टाची एखादी फ्रॅन्चायजी आपल्याच घराच्या जवळपास सुरु झाली तर आश्चर्य वाटायला नको.


देशी कट्टा
Deshi Katta
416-418, Akurdi Railway Station Rd, Sector Number 33, Sector No. 27, Pradhikaran, Nigdi, Pimpri-Chinchwad, Pune, Maharashtra 411044

अधिक माहितीसाठी संपर्क साधा- 086050 28900
https://maps.app.goo.gl/wCKeos1MiFLxTTN37

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.