Pune : छावा स्वराज्य सेनेतर्फे विशेष मुलांसह साजरा केला नाताळ

एमपीसी न्यूज- छावा स्वराज्य सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाताळ दिनाचे औचित्य साधून जांभूळवाडी येथील अक्षरस्पर्श मतिमंद निवासी विद्यालयास भेट देऊन तेथील अनाथ व मतिमंद मुलांसह नाताळ सण साजरा केला.

सेनेतर्फे मुलांना खाऊ, अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. आनंदाच्या एका क्षणासाठी आतुरलेल्या या मुलांनी या वेळी नाताळ सणाचा आनंद लुटला.

या प्रसंगी महिला प्रदेश अध्यक्षा शीतल हुलावळे, सरचिटणीस पुणे शहर सचिन मदगे, संपर्कप्रमुख पुणे शहर निर्मला रायरीकर, उपाध्यक्ष पुणे शहर महिला मंगल कांबळे, उपाध्यक्ष पुणे शहर सतीश कांबळे आणि कोथरूड मतदारसंघ अध्यक्षा मीना ठुले आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.