Bhosari : किल्ले शिवनेरीला केलेला संकल्प कर्नाळाला सार्थकी- अर्जुन म्हसे पाटील उपवनसंरक्षक

एमपीसी न्यूज- भूगोल फाऊंडेशन व वन्यजीव विभाग ठाणे जिल्हा, वन्यजीवविभाग कर्नाळा अभयारण्य.व कर्नाळा परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमी व वन्यजीव प्रेमी संस्थाच्या सहकार्याने गुरुवारी (दि. 19) कर्नाळा किल्ल्याच्या परिसरात निसर्गरम्य ठिकाणी पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केले होते.

यावेळी ठाणे जिल्हा वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटील, कर्नाळा वन्यजीव परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण, भूगोल फाउंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज, वनरक्षक युवराज मराठे, भूगोल फाउंडेशन व संतनगर व परिसरातील नागरिक, चार पाच गावातील ग्राम प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अर्जुन म्हसे यांनी भूगोल फाउंडेशन पर्यावरण आणि गडकिल्ले संवर्धन विषयी करत असलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, ” पर्यावरणा बरोबर विकास झाला पाहिजे, पण तो करताना कोणत्याही वन्य प्राण्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेता काम नये, निसर्गाने वन्यजीवांची दिलेल्या अनमोल देणगी वर मानवाने अतिक्रमण करू नये. जंगले ही वन्यजीवांची घरे / निवारा आहे, त्याला बाधा न येईल असे वागा”

प्रदीप चव्हाण म्हणाले की, वन्यप्राण्यावर प्रेम करा, जंगलावर त्यांचा हक्क आहे तोअबाधित राहिला पाहिजे, सहजीवन जगायला शिका आणि निसर्ग वाचवा. आपण झाडे तोडणे, जंगलांनी आग लावणे अश्या वाईट कृत्यांपासून परावृत्त झाले पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळा, प्रदूषण करू नका.

विठ्ठल वाळुंज पाटील यांनी भूगोल फाउंडेशन करत असलेल्या पर्यावरण, वृक्षारोपण आणि गडकिल्ले संवर्धनाचे विषयी माहिती दिली. वनसहलीसाठी आलेल्या गहिनीनाथ विद्यालय, बीड येथील ऊसतोड कामगारांच्या मुलांचे विशेष कौतूक करून त्यांनाही झाडे आणि पर्यावरणाचे महत्व पटवून दिले व झाडे लावण्याविषयी मार्गदर्शन केले.

युवराज मराठे यांनी या ठिकाणी असलेल्या विविध पक्षी आणि वन्य प्राणी विषयी छान माहिती दिली. निसर्ग न्याहळत भूगोल फाउंडेशन च्या टीमचे तरुण आणि ज्येष्ठ सहकारी किल्ल्यावर असणाऱ्या करणाई देवीचे दर्शन घेऊन किल्ल्याच्या अप्रतिम सुळक्याजवळ जाऊन किल्ल्याच्या आणि सभोवतालच्या परिसराचे सौंदर्य अनुभवले. या मोहिमेत महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.

भूगोल फाउंडेशनने 12 आक्टोबर 2017 ला सुरू केलेल्या या कामाची सुरुवात किल्ले शिवनेरीवर करून पर्यावरण आणि गडकिल्ले संवर्धनाचा शिवनेरीवर केलेला संकल्प कर्नाळा येथे सार्थ झाला. कर्नाळा वन्यजीव विभागाने अतिशय कष्ट घेऊन येथील परिसर स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी भूगोल फाउंडेशन व संतनगर व परिसरातील कामगार नेते हनुमंत लांडगे, शशिकांत वाडते, कर्नल तानाजी आरबुज, साहेबराव गावडे, निकुंज रेंगे, विठ्ठल मिसाळ, ग्रामपरिस्थितीकिय विकास समिती रानसई समितीचे सदस्य, सरपंच व इतर अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.