Maval : पवना धरणात 87 टक्के पाणीसाठा; गतवर्षीच्या तुलनेत 19 टक्के जादा पाणी

20 जुलै 2020 पर्यंत पुरणार पाणीसाठा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळवासियांची तहान भागविणा-या पवना धरणात आजमितीला (31 डिसेंबर) 87.41 टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 68.58 टक्के पाणीसाठा धरणात होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल 19 टक्के जादा पाणीसाठा धरणात असून 20 जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. दरम्यान, महापालिकेने समन्यायी पाणीवाटपासाठी 25 नोव्हेंबरपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे.

मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधा-यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणीपुरवठा केला जातो. पवना धरणात मुबलक पाणीसाठा आहे. परंतु, तरी देखील महापालिकेने 25 नोव्हेंबरपासून पाणीकपात लागू केली आहे. समन्यायी पाणीवाटपासाठी एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्याचे कारण त्याकरिता दिले आहे. तथापि, पाणीकपात लागू केली. तरी, देखील पाणीपुरवठ्याच्या तक्रारी कमी झाल्या नाहीत.

पवना धरणाचे शाखा अभियंता ए.एम. गडवाल म्हणाले, ‘धरणात आजमितीला 87.41 टक्के पाणीसाठा आहे. 20 जुलै 2020 पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 68.58 टक्के पाणीसाठा होता. त्यातुलनेत यंदा तब्बल 19 टक्के जादा पाणीसाठा धरणात आहे. हा पाणीसाठा मुबलक असून 20 जुलै 2020 पर्यंत पुरेल पाणी पुरेल. धरणात मुबलक पाणी आहे. तरीसुद्धा नागरिकांनी पाण्याचा जास्त वापर करु नये. पाण्याचा जपून वापर करावा’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.