Pimpri : उत्पादन शुल्क विभागाची शहरात करडी नजर

एमपीसी न्यूज – वर्षअखेर (31 डिसेंबर)च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची शहरात करडी नजर असणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने आपली पथके शहरात ठिकठिकाणी तैनात केली आहेत. बुधवारी (1 जानेवारी) पहाटेपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे.

पोलिसांची पिंपरी-चिंचवड शहरात रात्रभर गस्त राहणार आहे. काही संवेदनशील ठिकाणांची पाहणी पोलिसांनी केली असून त्या ठिकाणी विशेष लक्ष असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची दोन पथके शहरात रात्रभर गस्त घालणार आहेत. या पथकांकडून बेकायदेशीर मद्यविक्री करणा-यांवर कारवाई केली जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही कार्यालयांकडून दोन उत्पादन शुल्क निरीक्षक, चार उपनिरीक्षक आणि कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागाने मद्यपानासाठी तसेच मद्य जवळ बाळगण्यासाठी सुमारे 40 हजार परवाने वितरित केले आहेत. देशी मद्यासाठी पाच तर विदेशी मद्यासाठी दोन रुपये शुल्क एका दिवसासाठी घेण्यात आले आहे. हॉटेल चालकांसाठी हे दर वेगळे आहेत. दिवसाच्या परवान्यासाठी त्यांना 20 हजार रुपयांचे शुल्क आकारले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.