Chinchwad : विविध सामाजिक उपक्रमांनी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दिव्यांग बांधवांना ‘व्हिलचेअर’चे वाटप करण्यात आले. चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आश्रमाला जीवनावश्यक धान्यांचे वाटप करण्यात आले. मोफत वैद्यकीय तपासणी,  प्राण्यांसाठीच्या रुग्णवाहिकेचे अनावरण करण्यात आले.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा 31 डिसेंबर 2019 रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले. निगडीतील घरकूल अपंग सहाय्य संस्थेच्या 30 सभासदारांना व्हिलचेअर, वॉकर, कुबड्यांच्या सेटचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या शिरुर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहुल कलाटे, संस्थेचे दत्ता भोसले, संगीता जोशी, नगरसेवक अमित गावडे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, विक्रम वाघमारे, अतुल भोंडवे, वैशाली मराठे उपस्थित होते. मित्र परिवार सोशल फाऊंडेशन आणि अमित गावडे युवा मंचाने कार्यक्रमाचे नियोजन केले.

_MPC_DIR_MPU_II

चिंचवडगावातील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलीत पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् आश्रमाला जीवनावश्यक धान्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मदर तेरेसा आश्रमात देखील धान्य वाटप केले. त्यामध्ये मसाले पदार्थ, डाळी, तेलाचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी अनंत को-हाळे, राहुल भोईर, राजेश शिरोळे, हेमंत डांगे, मंदार लोंढे, निलेश भोईर, नितीन बारणे उपस्थित होते.

त्याचबरोबर वाकड येथील आयुर्वेदंत यांच्या सहयोगाने मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. निर्भया फाऊंडेशनचे प्रवीण कोकणे यांनी प्राण्यांसाठीच्या रुग्णवाहिकेचे अनावरण केले. रहाटणी येथे झालेल्या कार्यक्रमाला पुनीता खन्ना यांच्यासह पशुप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राहुल कलाटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.