Pimpri : गादी कारखान्यात पाच लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – गादी कारखान्यातून गाद्या, उशा, कापूस, कापूस पिंजण मशीन, गादी शिलाई मशीन आणि अन्य साहित्य असा एकूण पाच लाख 16 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मासुळकर कॉलनी पिंपरी येथे घडली.

सुरेश बाबू बनसोडे (वय 32, रा. रहाटणी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रकाश मासुळकर, कमलेश मासुळकर, राम मासुळकर, सागर मासुळकर (सर्व रा. मासुळकर कॉलनी, अजमेरा, पिंपरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 डिसेंबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली आहे. फिर्यादी सूर्यवंशी यांचा मासुळकर कॉलनी येथे गाद्यांचा कारखाना आहे. 8 डिसेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास त्यांनी कारखाना बंद केला. रात्री संशयित चार चोरट्यांनी त्यांच्या कारखान्यातून गाद्या, उशा, कापूस, कापूस पिंजण मशीन, गादी शिलाई मशीन आणि अन्य साहित्य असा एकूण पाच लाख 16 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. सूर्यवंशी यांनी 1 जानेवारी रोजी फिर्याद दिल्याने घटनेनंतर तब्बल 20 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.