Nigdi : प्राधिकरणात उभारणार महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा

62 लाख रुपये येणार खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडी, प्राधिकरणामध्ये महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 62 लाख 70 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 निगडी, प्राधिकरणामध्ये महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या कामाला अनुसरून विविध कामे देखील करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका स्थापत्य विभागातर्फे निविदा मागविण्यात आल्या होत्या. मूळ 83 लाख 15 हजार 553 रुपये किंमतीच्या या कामासाठी रॉयल्टी आणि मटेरीअल टेस्टिंग चार्जेस वगळून 81 लाख 82 हजार 915 रुपयांवर निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार मेसर्स अनुष एन्टरप्राईजेस, मेसर्स एच. आर. गायकवाड, मेसर्स तन्मय एंटरप्राईजेस आणि मेसर्स पी. एन. नागण या चार ठेकेदारांनी निविदा सादर केल्या.

त्यामध्ये सर्वाधिक कमी म्हणजे 24.99 टक्के कमी दराची निविदा मेसर्स अनुष एंटरप्राईजेस या ठेकेदार कंपनीने सादर केली. त्यांनी हे काम 61 लाख 38 हजार 5 रुपये अधिक 85 हजार 688 रुपये रॉयल्टी आणि 46 हजार 950 रुपये मटेरिअल टेस्टींग चार्जेस असे एकूण 62 लाख 70 हजार 643 रुपयांमध्ये करून देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे निगडी, प्राधिकरणामध्ये महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारणे आणि त्याअनुषंगिक कामे मेसर्स अनुष एंटरप्राईजेस यांच्याकडून करून घेण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.