Chinchwad: चिंचवडमध्ये मनाच्या श्लोकांची प्रभात फेरी

एमपीसी न्यूज – चिंचवडमध्ये श्री रघुवीर समर्थ महाराज यांच्या मनाच्या श्लोकांची प्रभात फेरी रविवारी (दि. 5) सकाळी 6 ते 7 या वेळेत काढण्यात आली. प्रभात फेरीत 55 नागरिक सहभागी झाले होते.

श्री सिद्धिविनायक मंदिर संभाजीनगर पासून शाहूनगर, पूर्णानगर, शिवतेजनगर या परिसरातून प्रभात फेरी काढण्यात आली. प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला ही प्रभात फेरी काढण्यात येते. पहिल्या प्रभात फेरीत परिसरातील 35 नागरिकांनी सहभाग घेतला होता. या वेळेस 55 नागरिकांनी सहभाग घेतला. पुढच्या प्रभात फेरीस आणखी नागरिकांनी सहभाग घ्यावा जेणेकरून एक चांगला आदर्श लोकांपर्यंत ठेवता येईल, असे आवाहन मंगेश पाटील यांनी केले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.