Pune : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा संपन्न

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या’ स्पोकन मराठी अकादमी’ आणि’ सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी ‘तर्फे मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त शनिवारी (दि. 4) ‘मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. विकिपीडिया संपादन मार्गदर्शक म्हणून सुबोध कुलकर्णी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने 2020 यावर्षी महाजालावरील सर्वात मोठा मुक्त ज्ञानकोश असणाऱ्या ‘मराठी विकिपीडिया’ मध्ये मराठीतून जास्तीतजास्त ज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शासनाने सर्व संस्थाना आवाहन केले होते. याला प्रतिसाद म्हणून ही संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

विविध विषयातील ज्ञान आणि विश्वसनीय माहिती मराठीतून सर्व समाजाला सहजपणे व मुक्तपणे उपलब्ध व्हावी यासाठी ‘मराठी विकिपीडिया’ या मुक्त ज्ञानकोशात जास्तीतजास्त नागरिकांनी सतत संपादन करायला हवे ,यासाठी स्पोकन मराठी अकादमी, आझम कॅम्पस, पुणे आणि सेंटर फॉर इंटरनेट अँड सोसायटी यांनी पुढाकार घेतला.स्पोकन मराठी अकादमी च्या संचालिका नूरजहाँ शेख यांनी स्वागत केले..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.