Pimpri : भाजप-राष्ट्रवादीत श्रेयवाद, पाण्याच्या टाकीचे दोनवेळा उद्घाटन

एमपीसी न्यूज – पिंपरीगावातील महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 20 लक्ष लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीच्या कामावरुन भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाचे राजकारण झाले आहे. एकाच टाकीचे दोनवेळा उद्घाटन करण्यात आले. अगोदर राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांनी विरोधी पक्षनेत्याच्या हस्ते तर नंतर भाजप नगरसेवकाने महापौरांच्या हस्ते उद्घाटन केले.

पिंपरी महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 21 मधील पिंपरी वाघेरे येथील कै.अनुसयाबाई वाघेरे प्राथमिक शाळेच्या परीसरात नव्याने 20 लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारली आहे. या जलकुंभास माजी कार्यकारी अभियंता कै.दिलीप गुलाबराव कुदळे असे नामकरण केले आहे. या प्रकल्पास सुमारे 19 कोटी 38 लाख रुपये खर्च आलेला आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये राष्ट्रवादीचे डब्बू आसवाणी, उषा वाघेरे आणि निकिता कदम असे तीन नगरसेवक आहेत. तर, सत्ताधारी भाजपचे संदीप वाघेरे हे एकमेवर नगरसेवक आहेत. त्यांच्यात सातत्याने श्रेयवाद होतो.

आज सकाळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, संध्या दिलीप कुदळे यांच्या हस्ते टाकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, नगरसेवक डब्बू आसवाणी, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे उपस्थित होते.

त्यानंतर महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते पुन्हा या टाकीचे उद्घाटन करण्यात आले. दोनवेळा एकाच टाकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसदस्य संदीप वाघेरे, सहशहर अभियंता मकरंद निकम, माजी नगरसदस्य रंगनाथ कुदळे आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.