Dehugaon : शिवप्रेमींनी केले शिवचरित्राचे पारायण

एमपीसी न्यूज- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पिंपरी चिंचवड जिल्हा यांच्या वतीने अलीकडेच देहूगाव येथे प्र.के.घाणेकर लिखित “छत्रपती शिवराय” या ग्रंथाचे पारायण करण्यात आले. यामध्ये 55 शिवचरित्र अभ्यासकांनी सहभाग घेतला. तरुणांमध्ये शिवचरित्र वाचनाची आवड निर्माण व्हावी व शिवरायांचे गुण आत्मसात करण्यासाठी तसेच इतिहास अभ्यासण्याची गोडी लागण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या पारायण सत्राचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे विभाग कार्यवाह मुकुंद कुलकर्णी, जिल्हा सहकार्यवाह बाळासाहेब लोहकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी छत्रपती शिवराय ग्रंथाचे लेखक प्र.के.घाणेकर यांनी मार्गदर्शन केले

जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे दहावे वंशज व देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. मधुकर महाराज मोरे तसेच देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज मोरे व ह.भ.प. श्री. माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते उपस्थित तरुणांना शिवचरित्राची प्रत प्रदान करण्यात आली त्यानंतर एकूण चार सत्रामध्ये शिवचरित्राचे पारायण करण्यात आले.

या पारायण सत्राचा समारोप जिल्हा कार्यवाह विलासराव लांडगे, प्रांत सहबौध्दिक प्रमुख डॉ. प्रसाद जोशी, विभाग सहकार्यवाह चंदुभाऊ पाठक, दिलीप कंद, दत्ताजी बारसवडे, नरेंद्र खांबे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी संत विकासनंद सरस्वती यांनी पारायण करणाऱ्या अभ्यासकांना आशीर्वाद दिले. इतिहास संशोधक डॉ. ब. हि. चिंचवडे यांनी शिवचरित्र अभ्यासण्याची गरज या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.