Sangvi : लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर पाठवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवणे, सोशल मीडियावर पाठवणे तसेच त्यांचे लैंगिक शोषण करणा-यांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाते. काही संस्था याबाबत वारंवार माहिती घेऊन संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास मदत करतात. असाच एक प्रकार सांगवी परिसरात उघडकीस आला आहे. एका तरुणाने लहान मुलांचे अश्लील व्हीडिओ सोशल मीडियावर पाठवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केवा परबाराम देवासी (वय 21, रा. पिंपळे गुरव, सांगवी. मूळ रा. गोयली गाव, ता. जि. सिरोई, राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश माने यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवासी याने 5 जानेवारी रोजी पिंपळे गुरव येथून त्याच्या मोबाईलवरुन लहान मुलांचे अश्लील व्हीडीओ फेसबुकवरुन त्याच्या एका मित्राला पाठवले. ही बाब शोषित आणि गहाळ मुलांसाठी काम करणा-या (एनसीएमईसी) या संस्थेच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. महाराष्ट्र राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा नोडल अधिकारी यांनी सांगवी पोलिसांना अहवाल पाठवून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, सांगवी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा 67 बी आणि पॉस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.