Talegaon Dabhade : नगरपरिषद प्रभाग क्रमांक 1 ब ची पोटनिवडणूक 6 फेब्रुवारी रोजी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रभाग क्रमांक 1 ब ची पोटनिवडणूक दि. 6 फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी परिपत्रकाव्दारे जाहीर केली आहे.

नगरसेवक संदीप बाळासाहेब शेळके यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांचेकडे दिला होता. राजीनामा मंजूर झाल्याने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीच्या कामकाजासाठी उपविभागीय अधिकारी, मावळ, मुळशी,उपविभाग पुणे संदेश शिर्के हे निवडणूक निर्णय अधिकारी तर सहाय्यक म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे-

1) नामनिर्देशन अर्ज भरणे- सोमवार (दि. 13) ते शुक्रवार (दि. 17) जानेवारी पर्यत.ठिकाण – तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालय सकाळी 11 ते 3 वाजेपर्यत,

2) नामनिर्देशन अर्ज छाननी- शनिवार (दि.18) जानेवारी सकाळी 11 वाजल्यापासून

3) नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याची तारीख गुरुवार (दि.23) जानेवारी दुपारी 3 वाजेपर्यत,

4) मतदान – गुरुवार (दि. 6) फेब्रुवारी  रोजी सकाळी 7.30 वा. ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यत

5) मतमोजणी – शुक्रवार (दि. 7) फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता. तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालयामध्ये होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.