Pimpri : वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करत फिरायला नेऊन अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे

एमपीसी न्यूज – वडिलांचा मित्र असल्याची बतावणी करत एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला फिरायला नेऊन घाणेरडे कृत्य करून अश्लिल चाळे केल्याप्रकरणी एका तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 9) पिंपरीत सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डी एस पी शंकर ऊर्फ महादेव पांडूरंग सूर्यवंशी (वय 28, रा. जोतिबानगर, तापकीर चौकाजवळ, काळेवाडी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलीला तिच्या पिंपरी येथील शाळेच्या प्रवेशव्दारावर आरोपी भेटला. मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे, असे त्याने मुलीला सांगितले. चल तुला शंकर महादेव मंदिराकडे देहूरोडला फिरायला नेतो, असे सांगून देहूरोड जवळील एका डोंगराच्या जंगलात मुलीला घेऊन गेला. तेथे मुलीसोबत अश्लिल चाळे केले. तसेच जबरदस्ती करून मुलीसोबत घाणेरडे कृत्य केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.