HSC Result : बारावीचा निकाल जाहीर; राज्यात कोकण विभाग प्रथम; मुलींची बाजी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (HSC Result) वतीने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, लातूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती आणि कोकण या नऊ विभागांमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत कोकण विभागाने (96.01 टक्के) बाजी मारली आहे. पुणे विभाग (93.34 टक्के) दुसऱ्या क्रमांकावर असून एकंदरीत राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील पास होणाऱ्यांमध्ये मुलींचा टक्का अधिक आहे.

Pimpri : सामान्यांच्या घरकुल योजनेवर करोडपती आमदारांचा डोळा?

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात इयत्ता बारावीची परीक्षा पार पडली. त्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि. 25) ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी सर्व शाखांमधून 14 लाख 28 हजार 194 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 7 लाख 67 हजार 386 मुले तर 6 लाख ४८ हजार 985 मुली होत्या. बारावीच्या परीक्षेत 6 लाख 84 हजार 118 मुले आणि 6 लाख 8 हजार 350 मुली पास झाल्या आहेत. मुलांचा निकाल 89.14 टक्के तर मुलींचा निकाल 93.73 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 4.59 टक्के मुलींचा निकाल जास्त लागला आहे.

बारावीची परीक्षा 154 विषयांसाठी घेण्यात आली. त्यातील 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या चार माध्यमातून तर इतर शाखांसाठी मराठी, हिंजवडी, इंग्रजी, उर्दू, गुजराती आणि कन्नड अशा सहा माध्यमांसाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल 44.33 टक्के
यावर्षी राज्यात 35 हजार 879 पुनर्परीक्षार्थी (रिपिटर) विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 35 हजार 583 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 15 हजार 775 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांची निकालाची टक्केवारी 44.33 टक्के आहे.

खासगी विद्यार्थ्यांचा निकाल 82.39 टक्के
यावर्षी राज्यात 36 हजार 454 विद्यार्थ्यांनी खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केली होती. त्यातील 35 हजार 834 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून 29 हजार 526 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची निकालाची टक्केवारी 82.39 टक्के आहे.

विभागानुसार निकाल
कोकण विभाग – 96.01 टक्के
पुणे विभाग – 93.34 टक्के
नागपूर विभाग – 90.35 टक्के
छत्रपती संभाजीनगर विभाग – 91.85 टक्के
कोल्हापूर विभाग – 93.28 टक्के
अमरावती विभाग – 92.75 टक्के
नाशिक विभाग – 91.66 टक्के
लातूर विभाग – 90.37 टक्के
मुंबई विभाग – 88.13 टक्के

मागील चार वर्षांचा निकाल
सन 2020 – 90.66 टक्के
सन 2021 – 99.63 टक्के
सन 2022 – 94.22 टक्के
सन 2023 – 91.25 टक्के

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.