Pune News : बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज : धुवोली (ता. खेड) येथे अजय चिंतामण जठार (वय 17) या बारावीच्या विद्यार्थ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. (Pune News) ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली असून, अजयने चार दिवसांपूर्वीच शेवटचा पेपर दिला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अजय जठार हा आपला मित्र साई वाळुंज याच्यासोबत शुक्रवारी सायंकाळी सात वाजता रानात जनावरे घरी परत आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अजयवर अचानक हल्ला केला. साईच्या समोरच हा हल्ला झाल्याने त्याने स्वतःला सावरत धीराने बिबट्याच्या दिशेने दगड मारला.

 

Alandi News : आळंदी मध्ये भक्ती शक्ती संघ आयोजित मासिक वद्य एकादशी भजन महोत्सव संपन्न

 

बिबट्याने अजयच्या मानेला धरून फरफटत जाळीमध्ये नेले. साईने त्याही परिस्थितीत बिबट्याच्या मागे पळत जाऊन जाळीत असलेल्या बिबट्याच्या दिशेने दगड मारल्याने बिबट्या पळून गेला; (Pune News) परंतु तोपर्यंत मानेवर इजा झाल्याने अजयचा जागीच मृत्यू झाला होता. साईचा आरडाओरडा ऐकून गावकरी घटनास्थळी आले.  बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.