Dehuroad News : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्य पदासाठी 26 अर्ज

एमपीसी न्यूज – देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्य पदासाठी 26  इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले. छाननीनंतर अध्यक्षांमार्फत हे अर्ज दक्षिण मुख्यालयाकडे पाठविण्यात येतील.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका वेळेत होऊ न शकल्यामुळे सद्य: स्थितीत त्रिसदस्यीय समितीव्दारे बोर्डाच्या कारभार चालविण्यात येणार  आहे. त्यासंदर्भात  शुक्रवारी  (दि.12) सायंकाळी  देहूरोड कॅन्टोन्मेंट  बोर्डाला कार्यवाहीचे पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार सोमवारी इच्छुकांनी अर्ज दाखल केले.

अर्जदारांमध्ये  भरत नायडू ,रमेश जाधव , सुनंदा आवळे (शिवसेना), हाजीमलंग मारीमुत्तु (कॉग्रेस), अ‍ॅड. अरुणा पिंजण, अशोक शेलार , अ‍ॅड. कैलास पानसरे, सागर लांगे (भाजप), अ‍ॅड.प्रवीण झेंडे, कृष्णा दाभोळे (राष्ट्रवादी), संकल्प भेगडे, डॉ.शालक आगरवाल,  यांचा समावेश आहे.

तसेच अर्ज सादर करण्याची शेवटच्या दिवशी मंगळवारी ॲड. मदन सोनिगरा, काशिनाथ दाभाडे, उमेश जैन, रवींद्र शेलार, संदीप गोंटे, संदीप बालघरे, इंद्रपालसिंग रत्तू, संगीता वाघमारे, बाळासाहेब जाधव, धनंजय मोरे, सतीश पिंजण, धनराज शिंदे, उल्हास शिंदे आदींनी अर्ज सादर केले.

छाननीनंतर बोर्डाच्या अध्यक्षांमार्फत अर्ज दक्षिण मुख्यालयाकडे पाठविण्यात  येतील. मुख्यालयाकडून पुन्हा छाननी होऊन तीन अर्ज संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहेत.

संरक्षण मंत्रालयाच्या मालमत्ता विभागाचे महानिदेशक यांच्याकडून अंतिम निवड जाहीर करण्यात येणार आहे.  इच्छुकांच्या यादीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांचा समावेश आहे.  यापैकी कोणाची निवड होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.