Pune : दौंड-पुणे पॅसेंजर थांबवून आंदोलन करणा-या तेरा महिलांना दंड

एमपीसी न्यूज – पुण्याच्या घोरपडी रेल्वे यार्डमध्ये दौंड-पुणे पॅसेंजर रेल्वेत प्रवास करणा-या महिलांनी साखळी ओढून गाडी थांबवली आणि या गाडीला अधिकचे थांबे देण्याच्या मागणीसाठी इंजिनसमोर आंदोलन केले. रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी तेरा महिलांना अटक केली आहे.

या तेरा महिलांना रेल्वे न्यायालयात हजर केल्यानंतर यातील 12 महिलांना रेल्वेच्या अधिनीयमानुसार चेनओढणे आणि उपद्रव करणे यासाठी 400 रुपयांचा दंड तर अन्य एका महिलेला 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या महिलांनी केलेल्या आंदोलनामुळे या मार्गावर धावणा-या 6 गाड्यांना धावण्यास उशीर झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.