Pimpri News : शहरात 13 लाख 38 हजार मतदार; निवडणुकीपर्यंत आणखी मतदार वाढणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात सद्यस्थितीत एकूण 13 लाख 38 हजार 27 मतदार आहेत. चिंचवडमध्ये सर्वाधिक साडेपाच लाख मतदार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी आणखी मतदार नावनोंदणी सुरू आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत मतदार संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

शहरात पिंपरी चिंचवड आणि भोसरी असे एकूण 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. भोसरी मतदारसंघात एकूण 4 लाख 51 हजार 357 मतदार आहेत. चिंचवडमध्ये सर्वाधिक 5 लाख 52 हजार 868 मतदार आहेत. पिंपरीत 3 लाख 57 हजार 812 मतदार आहेत, तर सध्या शहरात एकूण 13 लाख 38 हजार 27 मतदार आहेत.

सन 2017 च्या महापालिका निवडणुकीत शहरात एकूण 11 लाख 92 हजार 89 मतदार होते. त्यात पुरुष मतदार 6 लाख 40 हजार 696 तर, महिला मतदार 5 लाख 51 हजार 362 होते. मागील वेळेच्या तुलनेत यंदा 1 लाख 45 हजार 938 मतदार अधिक आहेत. एक सदस्यीय निवडणुका होणार असल्याने प्रत्येक वॉर्डाची मतदारसंख्या 12 ते 14 हजार असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.