Pimpri : भाजपकडून तीन जागांसाठी 13 जण इच्छुक, ‘हे’ आहेत इच्छुक

राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतल्या मुलाखती

एमपीसी न्यूज – शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून 13 जण इच्छूक आहेत. शिवसेनेचे आमदार असलेल्या पिंपरी मतदारसंघातून भाजपचे 7 जण इच्छुक आहेत. शहरातील तीन जागांसाठी भाजपकडून तब्बल 13 जण इच्छुक आहेत.

आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. वैद्यकीय शिक्षण, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि बंदरे या खात्याचे राज्यमंत्री तथा पिंपरी-चिंचवड भाजपचे पक्ष निरीक्षक रवींद्र चव्हाण यांनी आज (सोमवारी) इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पिंपरी, मोरवाडीतील पक्ष कार्यालयात मुलाखती झाल्या. यावेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, खासदार अमर साबळे, महापौर राहुल जाधव, प्रदेश नेत्या उमा खापरे, पीसीएनटीडीचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, सरचिटणीस बाबू नायर उपस्थित होते.

पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राजेश पिल्ले, अमित गोरखे, नगरसेवक शैलेश मोरे, वेणू साबळे, तेजस्विनी कदम, भीमा बोबडे, दीपक रोकडे यांनी मुलाखती दिल्या. तर, चिंचवडमधून शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर सचिन चिंचवडे, पिंपरीगावचे नगरसेवक संदीप वाघेरे या इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

भोसरी मतदारसंघातून आमदार महेश लांडगे, भाजयुमोचे शहराध्यक्ष रवी लांडगे, सरचिटणीस प्रमोद निसळ यांनी मुलाखती दिल्या आहेत. महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार महाजनादेश यात्रेत असल्याने मुलाखत देऊ शकले नाहीत. शहरातील तीन जागांसाठी तब्बल 14 जण इच्छूक आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.