Chinchwad : मिनी मॅरॉथॉनमध्ये धावले  1000 पिंपरी चिंचवडकर

एमपीसी न्यूज- श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान व साह्यकडा ऍडव्हेंचर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेल्या मिनी मॅरॉथॉनमध्ये 1000 पिंपरी चिंचवडकर धावले. स्पर्धेचे हे 3 रे वर्ष आहे.

एक पाऊल आरोग्याकडे हे ब्रीदवाक्य घेऊन या स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 12) चिंचवड येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्जुन पुरस्कार विजेते श्रीरंग इनामदार उपस्थित होते. माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे व बाबाजी चौधरी उपस्थित होते. सकाळी 6 वाजता मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला. सुरुवातीला सर्वानी झुंबा डान्स केल्यानंतर 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा तीन अंतरासाठी ही मॅरेथॉन पार पडली.

स्पर्धेनंतर सर्वांसाठी चहा नाश्त्याची सोया करण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. स्पर्धेचे प्रायोजकत्व घेतलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.