Pune : बेशिस्त पुणेकर वाहनचालकांनी एका वर्षात भरला 111 कोटींचा दंड ! नियमभंगाच्या 27 लाख केसेस

एमपीसी न्यूज- पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी 2019 सालचा अहवाल नुकताच सादर केला. या अहवालानुसार बेशिस्त पुणेकर वाहनचालकांवर वाहतूक नियमभंगाच्या 27 लाख 59 हजार 229 केस दाखल करण्यात आल्या. तर दंडापोटी एकूण 111 कोटी 74 लाख रुपये वसूल करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक केसे या विनाहेल्मेटच्या 17 लाख 5 हजार इतक्या आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या 24 वाहतूक विभागाअंतर्गत व सीसीटीव्हीद्वारे वाहतूक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही आणि ई-चलन डिव्हाईस मशिनद्वारे कारवाई करण्यात आली. त्यासाठी विशेष मोहिमा देखील राबविण्यात आल्या. याचा परिणाम होऊन पुणे पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अपघाताच्या संख्येत घट झाली. 2018 मध्ये 240 प्राणांतिक अपघातात 253 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 2019 मध्ये 199 प्राणांतिक अपघातात 206 नागरिकांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे

विना हेल्मेट 17,05,195
नो-पार्किंग 3, 23,074
विना लायसन्स 20, 719
झेब्रा क्रॉसिंग 59, 931
मोबाईल टॉकिंग 19, 299
रॅश ड्रायव्हिंग 12,026
रोंग साईड ड्रायव्हिंग 47, 932
नो एन्ट्री 35, 106
ट्रिपलसीट 16800,
इतर 3, 98, 708
लायसन्स जवळ न बाळगणे 1, 19, 789

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.