Nigdi : पादचारी तरुणाला लुटल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असताना तिघांनी त्याला अडवून जबरदस्तीने मोबाईल फोन आणि पाकीट काढून घेतले. हा प्रकार रविवारी (दि. 12) रात्री सव्वाअकराच्या सुमारास प्राधिकरण निगडी येथे घडला.

अथर्व आशिष तांबोळकर (वय 21, रा. आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास फिर्यादी अथर्व प्राधिकरण येथील आनंद रुग्णालयासमोरून रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी तीन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. अथर्व यांना मारहाण करून त्यांचा मोबाईल फोन आणि पैशांचे पाकीट जबरदस्तीने काढून घेतले. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.