Pune : दोन दिवसीय व्यसनमुक्ती परिषद शनिवारपासून

एमपीसी न्यूज- मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन आणि रोटरी घाटकोपर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने 22 व्या व्यसनमुक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेमध्ये वैद्यकीय समुपदेशक, वैद्यकीय प्रतिनिधी, डॉक्टर्स, व्यसनमुक्तीसाठी काम करणारे इच्छुक, समाजसेवक, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी, मानसोपचारतज्ञ सहभागी होऊ शकतात असे आयोजक डॉ. प्रकाश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

या वेळी मुक्ता चॅरिटेबल फाऊंडेशनच्या डॉ. रूपा अगरवाल आणि अश्विनी शिंदे उपस्थित होत्या. पुण्यात 18 व 19 जानेवारी 2020 रोजी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत मॉडेल कॉलनी येथील अँबेसिडर हॉटेलमध्ये ही परिषद होणार आहे. या परिषदेमध्ये विविध वयोगटातील​ स्त्रिया, पुरुष आणि मुले यांना जडणारी विविध प्रकारची व्यसने, व्यसनमुक्ती साठी केले जाणारे औषधोपचार, समुपदेशन, समुपदेशक आणि डॉक्टर्स साठी कार्यशाळा तसेच प्रश्नमंजुषा याचा समावेश आहे.

मोबाईलचे व्यसन, अमली पदार्थांचे व्यसन, दारूचे व्यसन, तंबाखूचे व्यसन आशा वेगवेगळ्या व्यसनाची माहिती आणि ती सोडवण्याचे व्यवस्थापन व मार्गदर्शन केले जाणार आहे. परिषदेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींसाठी परिषदेत झालेल्या विषयांवर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात येईल आणि त्यातील विजेत्यांना बक्षिसे देण्यात येतील असे डॉ. महाजन यांनी सांगितले.

परिषदेच्या समारोपास माजी सनदी अधिकारी महेश झगडे उपस्थित राहणार आहेत. परिषदेत सहभागी होण्यासाठीची अंतिम तारीख 16 जानेवारी असून इच्छुकांनी  8329791312 वर संपर्क साधून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.