Lonavala : जिल्हास्तरीय नाट्यस्पर्धेत मावळ तालुक्याला चार तर भोंडे हायस्कूलला आठ मानांकन

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा परिषद, पुणे शिक्षण विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त लोणावळ्यातील अँड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल येथे नुकत्याच पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण आंतरशालेय नाट्यस्पर्धा व पु. ल. देशपांडे करंडक या जिल्हास्तरीय आंतरशालेय नाट्यस्पर्धेत मावळ तालुक्याला चार तर भोंडे हायस्कूलला आठ मानांकने प्राप्त झाली आहेत. सतरा गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 83 शाळांचे 1300 विद्यार्थी सहभागी झाले होते. ही नाट्य स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांमध्ये झाली.

मावळातील अँड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल-लोणावळा, व्ही.पी.एस. हास्कुल- लोणावळा, सरस्वती विद्या मंदिर-तळेगाव दाभाडे या तीन शाळांसह मॉर्डन हायस्कूल- शिवाजीनगर, पुणे, शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय-दौंड, जिल्हा परिषद शाळा- जाधववाडी गिरिम, दौंड, न्यू इंग्लिश स्कूल-फुरसुंगी,पुणे, जिल्हा परिषद शाळा-उंब्रज, जुन्नर, बि. जे. एस. स्कूल-पिंपरी यांनी आपापल्या विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

तर लोणावळ्यातील भोंडे हायस्कूलच्या सुयश वाघमारे, संजना दळवी, केतकी केळकर व प्रेरणा साळवेकर यांनी उत्कृष्ट अभिनयाचे तर अमृता पवार व रीना वानखेडे यांनी सर्वोत्तम दिग्दर्शकाचे वैयक्तिक पारितोषिक पटकाविले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचानालयाचे संचालक बिभीषण चावरे, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गणपतराव मोरे, विद्या निकेतन संस्थेचे अध्यक्ष अँड. माधवराव भोंडे, सचिव राधिका भोंडे, लोणावळ्याचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक देविदास कडू, भोंडे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका प्रगती साळवेकर व प्राथमिक विभागाच्या मुख्यध्यापिका अंजूम शेख यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेचे परीक्षण प्रकाश खोत, गिरीश भूतकर, संजीव मांढरे, शंकर घोरपडे, धनश्री तुळपुळे, हनुमंत कुबडे यांनी केले.

स्पर्धेचा अंतिम निकाल

नाटकाचे नाव आणि विजेत्या शाळा / विद्यालये

मराठी भाषा विभाग (मुले)

प्रथम :- शेवटी मैदान बोलू लागले (मॉर्डन हायस्कूल- शिवाजीनगर), द्वितीय:- इमारत आणि झोपडी (एम.एस.एस. हायस्कूल-चिंचवड), तृतीय:- दिल दोस्ती दुनियादारी (शिवाजी मराठा हायस्कूल-पुणे), उत्तेजनार्थ:- पुन्हा पेटवा मशाली (रा. पू.सबनीस हायस्कूल- नारायणगाव), गहाण (ग.भि. देशपांडे विद्यालय-बारामती).

मराठी भाषा विभाग (मुली)

प्रथम:- काकूंचा वाढदिवस (सरस्वती विद्या मंदीर-तळेगाव दाभाडे), द्वितीय:- मिळून साऱ्या जणी (आर्यन दे स्कूल-कात्रज-पुणे), तृतीय:- गुरुदक्षिणा (भैरवनाथ विद्यालय- दोंदे, खेड), उत्तेजनार्थ:- सत्यमेव जयते (कॅम्प एज्युकेशन सोसायटी- पुणे).

हिंदी भाषा विभाग (मुले)

प्रथम:- पदचिन्ह (अँड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल-लोणावळा), द्वितीय:- फिर वही कहानी (मॉर्डन हायस्कूल- पुणे), तृतीय:- गुरु (एंजल्स हायस्कूल- लोणीकाळभोर), उत्तेजनार्थ:- संस्कार (फत्तेचंद जैन हास्कुल-पिंपरी-चिंचवड),

हिंदी भाषा विभाग (मुली)

प्रथम:- अजनबी (व्ही.पी.एस.हायस्कूल-लोणावळा), व्दितीय:- नानी मॉ कि कहानी (एच.एन.सि.पी.हायस्कूल-पुणे), तृतीय:- जिंदगी कि पाठशाला (जिजामाता मुलींचे हायस्कूल), उत्तेजनार्थ :- सिपाई कि मॉ (पलांडे आश्रम शाळा- मुखई, शिरूर).

इंग्रजी भाषा विभाग (मुले)

प्रथम:- द वील (शेठ ज्योतीप्रसाद विद्यालय-दौंड), द्वितीय:- किंगडम ऑफ टेन्सेंस (एच.एन.सि.पी.हायस्कूल-पुणे),

इंग्रजी भाषा विभाग (मुली)

प्रथम:- मिस स्लीपरी (न्यू इंग्लिश स्कूल-फुरसुंगी,पुणे), द्वितीय:- अवर पोटॅशिअल (टी.डी.पठारे हायस्कूल-खराडी-पुणे), तृतीय:- वेन नेचर स्पीकस (जनता विद्यालय- घोडेगाव), उत्तेजनार्थ:- फुटबॉल अँड फेअरी (जिजामाता विद्यालय-पुणे).

जिल्हा परिषद प्राथमिक विभाग (मुले)

प्रथम:- कट्टी बट्टी (जिल्हा परिषद शाळा-जाधववाडी, गिरीम-दौंड), द्वितीय:- सत्याचे बीज (जिल्हा परिषद शाळा-गडद, खेड), तृतीय:- आनंदाची शाळा (जिल्हा परिषद शाळा-नांदे, मुळशी), उत्तेजनार्थ:- आणि गमंत झाली (जिल्हा परिषद शाळा-सावळ, बारामती).

जिल्हा परिषद प्राथमिक विभाग (मुली)

प्रथम:- ‘हुंदका’ (जिल्हा परिषद शाळा- उंब्रज, जुन्नर), द्वितीय:- ‘कर्माचे फळ’ (फुलेनगर-इंदापूर), तृतीय:- ‘सारे जहॉ से अच्छा’ (जिल्हा परिषद शाळा-भोईवस्ती, मुंढवा), उत्तेजनार्थ:- ‘घरटे’ (जिल्हा परिषद शाळा- पोम्ब्रर्डी, भोर).

खासगी प्राथमिक विभाग (मुले)

प्रथम:- ‘नवस’ (बि. जे. एस. स्कूल-पिंपरी), द्वितीय:- ‘वारसा’ (शारदाबाई पवार प्राथमिक शाळा-बारामती), तृतीय:- ‘जरा माझं पण ऐका’(व्ही. जे.स्कूल- कांदळी, जुन्नर ), उत्तेजनार्थ:- ‘आमचा काय गुन्हा’ (एंजल्स इंग्लिश हायस्कूल- लोणीकाळभोर),

खासगी प्राथमिक विभाग (मुली)

प्रथम:- ‘आभाळमाया’ (अँड. बापूसाहेब भोंडे हायस्कूल-लोणावळा), व्दितीय:- ‘छकुली’ (न्यू. इंग्लिश स्कूल-लांडेवाडी), तृतीय:- ‘बाप्पा पळाला’ (विद्याधाम प्रायमरी स्कूल-शिरूर), उत्तेजनार्थ:- ‘आपले पर्यावरण’ (जिजामाता प्राथमिक विद्यालय-भोर).

लोणावळ्यातील अँड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या सुयश वाघमारे याने ‘पदचिन्ह’ या नाट्यातील ‘रामू’ भूमिकेला, संजना दळवी हिला ‘द ड्रीम’ मधील रिया या भूमिकेला, केतकी केळकर व प्रेरणा साळवेकर यांना ‘आभाळ माया’ मधील भूमिकेला उत्कृष्ट अभिनयाचे तर अमृता पवार (पदचिन्ह) व रीना वानखेडे (आभाळमाया) यांनी सर्वोत्तम दिग्दर्शकाचे पारितोषिक पटकाविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.