Pune : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीमध्ये 75 वा आर्मी डे साजरा

एमपीसीन्यूज- महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी मध्ये 75 वा आर्मी डे साजरा करण्यात आला.

आझम कॅम्पस मैदानामध्ये 9 विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शानदार परेड प्रात्यक्षिके सादर केली. हा कार्यक्रम बुधवारी, 15 जानेवारी रोजी दुपारी पार पडला. लेफ्टनंट कर्नल जगजीत सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार, सुभेदार खान, मुख्याध्यापक परवीन शेख, आयेशा शेख, मुमताझ सय्यद, शिक्षक वर्ग उपस्थित होते.एनसीसी, आरएसपी प्लॅटून नी परेड प्रात्यक्षिके सादर केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.