Ravet : हॉटेल मेजवानीची खासियत, कुरकुरीत फ्राय पापलेट आणि खेकडा थाळी !

(अश्विनी जाधव)

एमपीसी न्यूज- आजकाल बाहेर जाऊन जेवण करणे यात कोणतीही नवलाई राहिलेली नाही. आधी कसं खूप कमी वेळा बाहेर खायचो आणि त्यामुळेच त्याचं कौतुकही असायचं. आता काय मनात आलं की बाहेर जेवायला जातो आपण. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून सगळं काही मिळतं. (आळशी झालोय का आपण…असो 😜😜) आपल्याला फक्त इतकंच बघायचंय की चांगलं कुठे मिळतं. हो कारण असं अनेकदा होतं बाहेर खाताना की आई म्हणतेच… “या पेक्षा जास्त चांगलं तर मी घरी बनवलं असतं” 🤭🤭😀

बरं म्हणजे हे जे चांगलं मिळतं ना बाहेर ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी प्रामाणिकपणे करते. नॉनव्हेज म्हणजे माझं जीव की प्राण. माझं सभोवार कायम लक्ष असतं कुठे चांगलं खायला मिळेल. कळालं तर लगेच जाऊन खाऊन येते मी… आणि हो तुम्हांला ही सांगतेच की लगेच.

मागे एकदा रावेत मध्ये चालू झालेल्या हॉटेल मेजवानीला जाऊन आले तेव्हा तिथल्या मटण आणि फिश थाळी बद्दल मी तुम्हांला सांगितलं होतंच. फार छान अनुभव होता. तिथलं घरगुती पद्धतीचं जेवण आणि क्वालिटी खूप छान आहे. त्यामुळे मी या ना त्या कारणाने हॉटेल मेजवानीला भेट दिली. एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की पहिल्या दिवशी जी क्वालिटी मिळाली होती तिच अजूनही मेंटेन आहे.

मी तिथे अजून काय काय खादाडी केलीये ते सांगायला हा Review चा घाट घातलाय. आपल्या सगळ्यांनाच आवडणारा #पापलेट जर मस्त अशा टेस्टी मसाल्यामध्ये स्टफ करून आणि मस्त कुरकुरीत फ्राय करून दिला तर.. दिल खुश ना एकदम 😋😋😍 yessss आणि तेही अगदी फक्त 299/- मध्ये. बर फिश एकदम ताजा ताजा आणि छान होता आणि सगळ्यांत जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे फिशच्या पोटाला कट देऊन त्याच्या आत ते स्टफिंग जाऊन बसलं होतं. बरेचदा असं होतं की मसाला फक्त बाहेरच असतो. आत पर्यंत मुरलेला नसतो. पण मी खाल्लेला हा मासा अपवाद होता. उत्तम मॅरिनेशन आणि मसाल्यांचे परफेक्ट प्रमाण यांनी त्याची चव नक्कीच वाढली होती. नक्की खाऊन बघा.. इतक्या कमी किंमतीत इतका छान चवीचा पापलेट फिश नक्कीच नाही मिळणार कुठे.
#Stuffed_Pomfret_Fry – 299/-

#खेकडा_थाळी अजून एक अफलातून पेशकश.. खेकडा लव्हर्स साठी सुवर्णसंधी आहे ही. मला मनापासून आवडतात. पण इकडे फारसे कुठे आवडले न्हवते. म्हंटलं चला आता इतकं सगळं चांगलं मिळतंय तर एकदा खेकडा पण खाऊन बघुयात. असं म्हणून घेतली थाळी एकदा आणि काय.. टुणकन उडी मारली एक.. समुद्राच्या पाण्यातले पांढरे खेकडे होते. मला तेच बरे वाटतात खायला. बाकी नदीकाठचे वगैरे खेकडे काय माहित कुठे कुठे राहतात 😜😜😜

तर हो खेकडा थाळी पण एकदम छान. म्हणजे आवडत असेल तर नक्की घ्या. एक संपुर्ण खेकडा आणि त्याचा मस्त तिखट रस्सा.. सोबत 2 तांदळाच्या भाकऱ्या, सुकट चटणी आणि इंद्रायणीचा भात असा मस्त मेनु जमतो हा. आवडेल नक्की.. जर खेकडा कधी खाल्ला नसेल किंवा कसा खायचा ते माहित नसेल मग तर आवर्जून जाऊन खा. ओनर खुप चांगले आहेत शिकवतील तुम्हांला कसं खायचं ते 😜😜😜😜🤩
#Crab_Thali – 450/-

माझा आत्तापर्यंतचा Mejwani Hotel चा अनुभव अतिशय चांगला आहे. अप्रतिम क्वालिटीचं जेवण आणि प्रेमाने केलेले आदरातिथ्य यामुळेच त्यांच्या कडे फॅमिली नेहेमीच जास्त दिसतात. या पुढेच्या वाटचालीसाठी माझ्याकडून हॉटेल मेजवानीला खुप खुप शुभेच्छा !!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.