BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : प्लॅटफॉर्मवर विसरून गेलेला महागडा मोबाइल रेल्वे पोलिसांनी महिलेला केला परत

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर विसरून गेलेला 25 हजार रुपये किमतीचा मोबाईल पोलिसांनी संबंधित महिलेला परत केला.

शुक्रवारी (दि. 17) संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना प्लॅटफॉर्मवर रेल्वे पोलिसांना एक मोबाइल आढळून आला. ड्युटीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना मोबाईल दाखवून त्यांच्याकडे विचारणा केली परंतु कोणीही समोर आले नाही. त्याचवेळेस एका महिलेने त्या मोबाइलवर फोन करून आपला मोबाईल तळेगाव स्टेशनला विसरला असल्याचे सांगितले. उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर महिलेला तळेगाव स्टेशन येथे येऊन ओळख पटवून मोबाईल नेण्यास सांगितले

महिलेने आपली ओळख पटवून दिल्यानंतर पोलिसांनी तिला तिचा मोबाइल परत केला. आपला मोबाइल परत मिळाल्याबद्दल तिने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. यावेळी उपनिरीक्षक पी सी कुजूर, ए एस आय पी आर जाधव, विजय दुधाळ, हवालदार संजय तोडमल उपस्थित होते.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like