Vadgaon Maval : मावळ शिक्षक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी अण्णासाहेब ओहोळ

तज्ञ संचालकपदी बाळकृष्ण शिंगाडे व सुजाता तारळकर यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- मावळ तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी पुणे जिल्हा शिक्षक संघाचे सरचिटणीस, शिक्षक नेते आण्णासाहेब भीमराव ओहोळ यांची तर तज्ञ संचालकपदी बाळकृष्ण शिंगाडे व सुजाता तारळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी खोतकर साहेब यांनी ही निवड जाहीर केली.

यावेळी संघटनेच्या नेत्या शोभाताई वहिले, शिक्षक संघाचे सल्लागार बाळासाहेब औटी, उपाध्यक्ष तृप्ती गाडीलकर, माजी अध्यक्ष नारायण कांबळे, अमोल चव्हाण, राजू लोंढे, हवेली संघाचे नेते विलास थोरात, ज्ञानेश्वर शिवणेकर, हरिभाऊ आडकर, संदीप कांबळे, सुहास धस, प्रमोद भोईर, तालुकाध्यक्ष रमेश गायकवाड, जुनी पेन्शन संघटनेचे राज्य प्रवक्ते जगदीश ओहोळ, सहदेव डोंबे, गंगासेन वाघमारे, रमेश बनसोडे, राहुल लंबाते, हेमंत वाघमारे, सरचिटणीस दत्तात्रय भालेराव, मल्लिकार्जुन कांबळे, किशोर भालेराव, गणेश धिवार, भीमेश रोडगे, दीपक मेमाने, सुमित नळे, संतोष भारती, संचालिका कल्याणी रासकर, सुरेखा थोपटे, महादेव विरणक, सचिन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

“मावळ तालुका प्राथमिक शिक्षकांची सहकारी पतसंस्था ही मागील पाच वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. सभासदांना आमच्या संचालक मंडळाने डीव्हिडंड मिळवून दिला आहे, तो एक नवा आदर्श निर्माण केला आहे. पतसंस्थेची ही घोडदौड अशीच अधिक प्रगतीपथावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे” असे निवडीनंतर अण्णासाहेब ओहोळ म्हणाले.

शिक्षकांच्या न्याय व हक्कांसाठी झटणारे शिक्षक नेते अशी अण्णासाहेब ओहोळ यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या निवडी नंतर शिक्षक वर्गातून आनंद व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.