Pune : मांजा काढताना पाण्याच्या टाकीत पडल्याने अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पतंग उडवत असताना अडकलेला मांजा काढण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढलेल्या अकरा वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 19) सकाळी वडगाव येथील तुकाईमंदिर टेकडीवरील जलशुध्दीकरण केंद्राजवळ घडली.

अथर्व बापू गोरे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. सिंहगडरोड पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अथर्व हा हिंगणे खुर्द येथील जगताप महापालिका शाळेत पाचवीत शिकत होता. रविवारी सकाळी घराजवळ अथर्व हा त्याच्या लहान भावाबरोबर पतंग उडवीत होता. पतंग उडत असताना त्याचा मांजा जवळच तुकाईमंदिरावरील टेकडीवर जलशुध्दीकरणाच्या टाकीला अडकला. त्यानंतर अथर्व आणि त्याचा लहान भाऊ मांजा काढण्यासाठी तेथे गेले. त्यानंतर टाकीवर चढून अथर्व मांजा काढण्याच्या प्रयत्न करत असताना त्याचा तोल जाऊन जलशुध्दीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीत पडला. परंतु, त्याला पोहता येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्थवला पाण्यातून बाहेर काढले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.