Talegaon Dabhade : मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला उद्यापासून

एमपीसी न्यूज- इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने उद्या बुधवारपासून (दि. 22 ) मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेत तळेगावकर रसिकांना नामवंत वक्त्याचे विविध विषयांवरील विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. ही व्याख्यानमाला कांतीलाल शहा विद्यालयातील स्वर्गीय केशवराव वाडेकर सभागृहात दररोज सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहे. अशी माहिती संस्थेचे खजिनदार चंद्रकांत शेटे व प्राचार्य डाॅ संभाजी मलघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या व्याख्यानमालेचे उदघाटन बुधवारी (दि. 22) गणेश शिंदे यांच्या ‘जीवन सुंदर आहे’ या व्याख्यानाने होणार आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (दि. 23) आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार हे वन, मृद, पाणी’- युवकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

शुक्रवारी (दि. २४) या व्याख्यानमालेचा समारोप ज्येष्ठ लेखक व प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये व पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांच्या व्याख्यानाने होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये डॉ. संजय उपाध्ये हे ‘जिंकलो ऐसे म्हणा’ या विषयावर आपले विचार व्यक्त करतील तर दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. सतीश देसाई यांचे ‘मी एक आनंद यात्री’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनील शेळके व नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे उपस्थित राहणार आहेत.

माजी आमदार, मावळ भूषण कृष्णराव भेगडे यांनी केलेल्या सामाजिक व सार्वजनिक कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच हा सामाजिक वसा व वारसा विद्यार्थी, पालक व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे कार्यवाह व कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक रामदास काकडे यांनी दिली. व्याख्यानमालेचे हे पाचवे वर्ष आहे. त्यानिमित्ताने विचारधन ऐकण्याची उत्तम संधी विद्यार्थी, पालकवर्ग, नागरिकांना मिळणार आहे. असे व्याख्यानमालेचे आयोजक, निमंत्रक, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह रामदास काकडे, विद्यालय विकास समिती सदस्य, कार्यक्रमाचे निमंत्रक आणि संयोजन समिती अध्यक्ष विलास काळोखे व कार्यक्रमाचे निमंत्रक प्राचार्य डाॅ एस के मलघे यांनी सांगितले.

व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, गोरख काळोखे, विश्वस्त सुरेशभाई शहा, शैलेशभाई शाह, दीपक शाह, व्ही डी क्षीरसागर, अर्चनाताई घारे, महाविद्यालय विकास समिती सदस्य निरूपा कानिटकर, गणेश भेगडे, संजय साने, यतीन शहा, संदीप काकडे, सुनील काशिद, चंद्रभान खळदे, संजय वाडेकर त्याचबरोबर संयोजन समितीचे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. व्याख्यानमालेचा लाभ मोठया संख्येने विद्यार्थी व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.