Bhosari : इंद्रायणी थडी यात्रेत साकारणार अयोध्येतील ‘राम मंदिरा’ची प्रतिकृती

एमपीसी न्यूज –  शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ‘इंद्रायणी थडी’ जत्रेत अयोध्या येथे उभारण्यात येणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे.

भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचच्या पुढाकाराने भोसरीत महाराष्ट्रातील सर्वात मोठी ‘इंद्रायणी थडी’ जत्रा आयोजित केली जात आहे. येत्या 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2020 असे चार दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 10 या वेळेत ही जत्रा कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाजवळील गावजत्रा मैदानावर होणार आहे.

‘महिला सुरक्षा आणि सन्मान’ अशी थीम घेवून यावर्षी ‘इंद्रायणी थडी’ जत्रा आयोजित केली जात आहे. तब्बल 800 स्टॉल उभारले जाणार आहेत. तुफान गर्दी होणाऱ्या या जत्रेत अयोध्या येथे साकारणाऱ्या ‘राम मंदिर’ची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण या हेतुने सुरू केलेल्या इंद्रायणी थडी जत्रेत यावर्षी जाज्वल्य हिंदुत्वाची साक्ष देणाऱ्या ‘राम मंदिर’ची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.