BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : यशवंतनगरमध्ये पोलिसांची जनजागृती

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील यशवंतनगर परिसरातील वाढत्या सोनसाखळी चोरीला आळा घालण्याकरिता महिला व ज्येष्ठ नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी मंगळवारी बैठक घेतली. नागरिकांना दक्षता घेण्याच्या सूचना केल्या.

यावेळी नगरसेवक निखिल भगत, सामाजिक कार्यकर्ते संविद पाटील, यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यशवंतनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे परिसरातील महिला भयभयीत झाल्या आहेत. महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. सोनसाखळी चोरीच्या घटना होऊ नये, यासाठी तळेगाव पोलिसांनी महिला आणि नागरिकांसमवेत बैठक घेतली. सोनसाखळी चोरीचे प्रकार टाळण्यासाठी विविध उपाय योजनांची माहिती दिली.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like