Sangvi : टिकटॉकवर महिलेबाबत अश्‍लिल कमेंट केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – टिकटॉकवर महिलेने अपलोड केलेल्या व्हिडिओवर अश्‍लिल कमेंट केली. तसेच मुलीच्या टिकटॉक व्हिडिओला अश्‍लिल गाणे लावले. याप्रकरणी पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सांगवी येथे घडली.

अक्षय साहेबराव म्हसे (रा. जुनी सांगवी), गोविंद पाटील (रा. हिंगोली), सत्यवान झांजे (रा. कात्रज, पुणे), रोहण कणसे (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) आणि सूरज जाधव (रा. रहाटणी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 40 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 1 जुलैपासून वेळोवेळी महिलेच्या टिकटॉक व व्हॉटस्‌ऍपवर घडली. फिर्यादी महिलेने टिकटॉकवर अपलोड केलेल्या व्हिडिओवर आरोपी अक्षय याने अश्‍लिल कमेंट केली. तसेच व्हॉटस्‌ऍपवर शिवीगाळ व मारण्याची धमकी दिली. अक्षय याने आपल्या ओळखीच्या इतर आरोपींना पिडित महिलेचा मोबाईल क्रमांक देऊन अश्‍लिल मेसेज व धमकी देण्यास सांगितले. अक्षय याने फिर्यादी यांच्या मुलीच्या नावे अकाऊंट तयार करून त्यात फिर्यादीच्या मुलीने टिकटॉकवर अपलोड केलेल्या व्हिडिओला एडीट करीत अश्‍लिल गाणे टाकले. तसेच तो व्हिडिओ टिकटॉकवर अपलोड केला.

वाकड येथे राहणाऱ्या एका 29 वर्षीय महिलेने अक्षय याच्या व्हिडिओवर कमेंट केली होती. त्यावर अक्षय याने तुझा पत्ता सापडला आहे. लवकरच माझी टीम घेऊन तुझ्या घरी येणार असल्याची धमकी दिली. तसेच आरोपी गोविंद पाटील याने आपल्या टिकटॉक अकाऊंटवरून फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1