Talegaon Dabhade : शालेय अभ्यासक्रमात नाट्यशिक्षण आवश्यक- भाऊसाहेब भोईर

कलापिनी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित नाट्य वाचन स्पर्धा

एमपीसी न्यूज- विद्यार्थ्यांमधील अभिनय कलेला उत्तेजन मिळावे यासाठी शालेय अभ्यासक्रमात नाट्यशिक्षण आवश्यक आहे असे मत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील कलापिनी व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आयोजित नाट्य वाचन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे, स्पर्धा संयोजक अशोक बकरे, कलापिनीच्या उपाध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, सारंग माताडे, प्रमोद शुक्ला उपस्थित होते.

या स्पर्धेमध्ये मावळ, खेड, पिंपरी-चिंचवड विभागातील शालेय, शिक्षक व खुल्या विभागातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तिन्ही विभागात एकूण 33 संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे हे 14 वे वर्ष आहे. प्राथमिक फेरीचे परीक्षण उर्मिला बासरकर, डॉ.आनंद वाडदेकर, विराज सवाई, डॉ.सुहास कानिटकर, किरण येवलेकर व अर्चना लिमये यांनी केले तर अंतिम फेरीसाठी मनोज डाळींबकर(चिंचवड), राजेंद्र देशपांडे (पुणे) व दिलीप पुराणिक (पुणे) यांनी परीक्षण केले.

शालेय, शिक्षक आणि खुल्या गटांच्या अंतिम फेरी नंतर संघाच्या प्रतिनिधींचा सहभाग असलेला परिसावंद घेण्यात आला. या परिसंवादात सर्व संघांच्या सादरीकरणाविषयी सखोल चर्चा झाली. या परिसंवादाचे संचालन श्रीधर कुलकर्णी, तेजस्विनी गांधी आणि शार्दुल गद्रे यांनी केले.

भाऊसाहेब भोईर यांनी तळेगावचे सांस्कृतिक वैभव वाढविणाऱ्या कलापिनी व अ.भा.म.नाट्यपरिषद तळेगाव या दोन्ही आयोजक संस्थांचे कौतुक करून शालेय शिक्षणामध्ये नाट्य शिक्षणाचा समावेश करणे गरजेचे आहे असे मत मांडले. कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक केले व स्पर्धेला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादा बद्दल स्पर्धकांना धन्यवाद दिले. विनायक लिमये आणि अनुजा झेंड यांनी दिनेश कुलकर्णी रचित,’वाचू दे मज वाचू दे…हे समयोचित गीत गाऊन उपस्थितांची दाद मिळविली. नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र गडसिंग यांनी आभार मानले.

या स्पर्धांच्या यशस्वी संयोजनामध्ये मुकुंद इनामदार, रश्मी पांढरे, विनायक काळे, चेतन पंडित, आदित्य धामणकर, चैतन्य जोशी, सायली रौन्धळ, शार्दुल गद्रे, सुमेर नंदेश्वर, तेजस्विनी गांधी, श्री व सौ.बुरसे , रामचंद्र रानडे, विश्वास देशपांडे व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेचा निकाल

शालेय गट – सांघिक प्रथम – “कथा सावित्रीची” डी.आय.सी.स्कुल निगडी

सांघिक द्वितीय – “विद्रूप” डी.आय.सी.स्कुल निगडी

सांघिक तृतीय – “काय भुललासी वरलिया रंगा” सरस्वती विद्यामंदिर तळेगाव

सांघिक उत्तेजनार्थ – “सिंहगडला जेंव्हा जाग येते” – सह्याद्री इंग्लिश स्कुल,तळेगाव

सांघिक उत्तेजनार्थ – “झेप घे रे” – सरस्वती विद्यामंदिर तळेगाव

सांघिक उत्तेजनार्थ – “सळो की पळो” – माउंट सेंट अॅन स्कुल तळेगाव

दिग्दर्शन

प्रथम – सौ.संगीता कुलकर्णी (विद्रूप), द्वितीय – सौ.छाया सांगळे (काय भुललासी वरलिया रंगा),

लेखन

प्रथम – सौ.संगीता कुलकर्णी (विद्रूप), द्वितीय – सौ.अमृता मुके( रोशनी)

अभिनय मुले – प्रथम –आर्य नेने ,द्वितीय- श्रेयस मालपोटे, तृतीय – धवल पुराणिक.

उत्तेजनार्थ – रुचिर देशमुख, यश काकडे, अमन शेख .

अभिनय

मुली – प्रथम- वरदा फाटक, द्वितीय –अन्य फाटक, तृतीय – गीतिका सुतार

उत्तेजनार्थ – सम्पक़्द दिवाकर, निशा जामदार, सी जोशी.

प्रोत्साहन पारितोषिक प्राथमिक फेरी – गार्गी लिंगायत, यश गुमटे, अक्षय मोटे, विवेक आंधळे.

शिक्षक विभाग – सांघिक प्रथम – “हिरकणी” (साईनाथ बालक मंदिर)

सांघिक द्वितीय – “बॅटरी संपली” (जैन इंग्लिश स्कुल)

सांघिक तृतीय – “शिक्षणाची ज्योत सावित्रीबाई फुले” – (सुमन रमेश तुलसियानी विद्यालय))

उत्तेजनार्थ – “अभिनेत्री” (डी.आय.सीज.इंग्लिश स्कुल), “मिसळ नभोवाणीची” (समर्थ

माध्यमिक शाळा निगडी), “नाटक महिला मंडळाचे”(सह्याद्री इंग्लिश स्कूल)

दिग्दर्शन

प्रथम – सौ.निशा बेलसरे (हिरकणी), दिग्दर्शन द्वितीय – धनश्री कांबळे (बॅटरी संपली),

लेखन –प्रथम -निशा बेलसरे (हिरकणी),द्वितीय – धनश्री कांबळे

मौखिक पार्श्वसंगीत – साईनाथ बालक मंदिर

अभिनय महिला

प्रथम –मानसी कुंभार ( हिरकणी), द्वितीय- अनघा कुलकर्णी (बॅटरी संपली) तृतीय – अमृता मुके (शिक्षणाची ज्योत सावित्रीबाई फुले)

उत्तेजनार्थ – ममता प्रजापती (मिसळ नभोवाणीची), पल्लवी नामजोशी (बॅटरी संपली), स्वाती कुलकर्णी (हिरकणी).

प्रोत्साहन पारितोषिक प्राथमिक फेरी – अंजली ढवंगळे,वैभवी फडके,प्रीती केसकर, शुभांगी डोंगरे,अर्चना काटे ,

खुला विभाग –

सांघिक प्रथम – “कैकयी” (नाट्यकुल तलेगाव दाभाडे)

सांघिक द्वितीय – “१०२९ डाऊन…” (हेरीटेज एज्युकेशन सोसायटी तळेगाव )

सांघिक तृतीय – “झाकोळ” – (नाट्यप्रेमी संघ चिंचवड )

उत्तेजनार्थ – “मी तुमचं भूत” (एस अंड टी आर्ट सर्कल),लोकशाही (सुदिन कलामंच), “‘रंग” (खयाल तळेगाव)

दिग्दर्शन प्रथम – श्रीधर कुलकर्णी (कैकयी), द्वितीय – क्षिप्रसाधन भरड ( १०२९ डाऊन).

लेखन –क्षिप्रसाधन भरड ( १०२९ डाऊन). वैभवी तेंडूलकर (झाकोळ)

मौखिक पार्श्वसंगीत – सम्राट काशीकर (१०२९ डाऊन).

अभिनय महिला – प्रथम – डॉ.विनया केसकर (कैकयी), द्वितीय – मीरा क्षिप्रसाधन भरड (१०२९ डाऊन), तृतीय – वैभवी तेंडूलकर(माई).

उत्तेजनार्थ – रुद्राणी नाईक (शिवम्मा), सायली शेंडे(झाकोळ),सायली रौन्धळ (रंग)

अभिनय पुरुष – प्रथम – श्रीधर कुलकर्णी(कैकयी), द्वितीय – क्षिप्रसाधन भरड(१०२९ डाऊन), तृतीय – आदित्य धामणकर (रंग)

उत्तेजनार्थ – अभिजित शेलार(मी तुमचं भूत), गांधार जोशी(रंग), चिन्मय शेंडे(लोकशाही)

प्रोत्साहन पारितोषिक प्राथमिक फेरी – सुमन जाधव, दीपाली जोशी,मीरा कोन्नुर, आश्लेषा नेमाणे, शेखर गानू, अनिकेत नेमाणे, रवींद्र पांढरे, श्रीपाद भिडे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.