Lonavala : किल्ले राजमाची येथे गिर्यारोहण आणि स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मॉडर्न ट्रेकिंग क्लब मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील किल्ले राजमाची गडावर दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन गिर्यारोहणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. गिर्यारोहणाबरोबरच गडाची स्वच्छता मोहीम, जीपीएस सर्वेक्षण, गडावरील जैवविविधतेचा अभ्यास इत्यादी उपक्रम राबविण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

या उपक्रमात महाविद्यालयातील 269 विद्यार्थी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. इतिहास संशोधक डॅा. प्रमोद बोराडे व त्यांचे सहकारी बजरंगदलाचे सोलापुर विभागाचे मंत्री संदेश भेगडे यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. बोराडे यांनी गडाविषयी सविस्तर माहिती, गडाचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.

विद्यार्थ्यांच्या वतीने गडावर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. डॉ. संजय पाटील, प्रा. नामदेव डोके, प्रा. कुमोद सपकाळ, डॉ.दीपक शेंडकर, प्रा.नुतन वाघमारे तसेच महाविद्यालय कर्माचारी नवनाथ शेळके, अमोल को-हाळकर, प्रकाश पाटोळे, राजेंद्र खुडे व आशिष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी प्रतिनिधी रवींद्र जाधव, किरण लष्करे, श्रुती भोईर, लक्ष्मण गायकवाड, आसिफ शेख यांचे विशेष सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.