Dehuroad : घरफोडी करून अडीच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

एमपीसी न्यूज – घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 44 हजार 600 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरुवारी दि. 23 सकाळी दहाच्या सुमारास रावेत येथे उघडकीस आली.

नरेंद्र पुल्लया वाणी (वय 31, रा. रावेत) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाणी यांचे घर 11 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधीत कुलूप लावून बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्याने कटावणीच्या सहाय्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून दोन लाख 44 हजार 600 रुपये किमतीचे 88.5 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.