-MPC-TOP-MOST-BANNER-I

Maharashtra Corona Update : राज्यात आज 13,165 नवे कोरोना रुग्ण, 346 रुग्णांचा मृत्यू 

13,165 new corona patients in state today, 346 deaths.

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – राज्यात आज  दिवसभरात 13,165 नवे कोरोनारुग्ण राज्यात सापडले आहेत तर, 346 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 9,011 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. 

राज्य आरोग्य मंत्रालयाच्या आकेडेवारी नुसार, राज्यात आज  9,011 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 4 लाख 46 हजार 881 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 6 लाख 28 हजार 642 झाली आहे. राज्यभरात सध्या 1 लाख 60 हजार 413 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

राज्यात आज 346 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात आजवर 21 हजार 033 रूग्णांचा मृत्यू झाला आहे राज्यातील मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे.

राज्यात 11 लाख 62 हजार 450 रुग्ण विलगीकरण मध्ये आहेत. 37 हजार 094 संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असले तरी गेल्या चार पाच दिवसांत अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या कमी होत आहे.

उलट नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर आणि नागपूर जिल्ह्यांतली अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता झपाट्याने वाढताना दिसते आहे.

राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढत असलं, तरी संसर्ग वेगाने पसरतो आहे, हे आजच्या आकडेवारीने स्पष्ट झालं आहे.

देशाच्या सरासरी मृत्यूदरापेक्षा महाराष्ट्राचा मृत्यूदर अधिक आहे. राज्यातला मृत्यूदर 3.35 एवढा झाला आहे. देशाचा सरसारी कोविड मृत्यूदर 1.94 टक्के एवढा आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1