Talegaon Dabhade : इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी उलगडला रायगडचा इतिहास

तळेगाव दाभाडे – तळेगाव आणि मावळ तालुक्यातील इतिहासप्रेमींसाठी डॉ. प्रिया बोराडे यांनी रायगड अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी यावेळी किल्ले रायगडचा इतिहास उलगडून दाखवला.

या अभ्यास सहलीत तळेगाव आणि मावळ तालुक्यातील 60 जण सहभागी झाले होते. पायथ्यापासून संपूर्ण प्रवास चालत करण्यात आला. यावेळी आजवर अनेकदा शिवचरित्राच्या विषयी पडणारे प्रश्न इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे यांनी स्पष्ट करून सांगितले.

डॉ. प्रमोद बोराडे म्हणाले की, “शिवचरित्र हे संपूर्ण प्रश्नमय झाले असून याची उत्तरे भावनेपेक्षा अभ्यासाने मिळविली पाहिजेत. खरा इतिहास समजून घेऊन जातीधर्माच्या पलीकडचा इतिहास समजून घेतला पाहिजे. इतिहासातील शंकाकुशंका तारतम्याने व अभ्यासाने समजून घेण्यासाठी अधिक मंडळींनी दुर्गदर्शन करणे आवश्यक आहे.”

यावेळी रायगडावर आलेल्या अनेक पर्यटकांनी डॉ. बोराडे यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी गर्दी केली होती. राजधानी राजगडहून रायगडला का हलविली ? समाधीचे सत्य काय ? स्वराज्याच्या सिंहासनाचे काय झाले ? वाघ्या कुत्रा खरा की खोटा? शिलालेख वाचन कसे करावे ? या संदर्भातील माहिती त्यांनी उलगडून सांगितली.

यापुढे कायम दुर्गदर्शन मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढील राजधानी रायगड अभ्यास सहल 9 फेब्रुवारी रोजी असून जास्तीतजास्त संख्येने दुर्गअभ्यास सहलीत सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. प्रिया बोराडे यांनी केले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.