Vadgaon Maval : गणेश जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा

एमपीसी न्यूज- बालविकास मित्र मंडळ व श्री चिंचेचा चिंतामणी गणपती मंदिराच्या वतीने गणेश जयंती निमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आज, मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता वडगाव मावळ येथे मंदिराजवळ होणार आहे. अशी माहिती अतुल राऊत यांनी दिली.

या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना चित्रासाठी विविध विषय देण्यात आले आहेत.

बालवाडी गट- आवडते चित्र, 1ली/2 री- फिशटँक, केक, आवडता पक्षी/ प्राणी, 3 री/ 4 थी – जोकर, सिनरी, निसर्ग चित्र, 5 वी ते 7 वी- माझे स्वप्न, पाण्याखालील जीवन, शेतकरी जीवन,स्वच्छता अभियान, 8 वी ते 10 वी- निवडणुकीचा प्रचार, दिंडी सोहळा, भारतातील गर्वाचा क्षण तसेच
खुला गट- ऐतिहासिक शिवकालीन प्रसंग, बाजार, वनभोजन करणारे कुटुंब, पुस्तकाचे किंवा मॅगझिनचे मुखपृष्ठ असे विषय देण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.