Talegaon Dabhade : कलापिनी व रोटरी क्लब तळेगाव सिटी आयोजित चित्रकला स्पर्धेत 850 बालकलाकारांचा सहभाग

एमपीसी न्यूज- कलापिनी व रोटरी क्लब तळेगाव सिटी आयोजित केलेल्या कै. ना वा खानखोजे स्मृती चित्रकला स्पर्धेला मावळ तालुक्यातील बालकलाकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला. बालवाडी ते खुला गटापर्यंत 850 बालचित्रकारांचा सहभाग होता. या स्पर्धेचे 36 वे वर्ष होते.

स्पर्धेचे उदघाटन रोटरी क्लब तळेगाव सिटीचे अध्यक्ष मनोज ढमाले, ऍडवायझर दिलीप पारेख यांच्या हस्ते झाले. प्राथमिक फेरीचे परीक्षण राधिका धोंगडे व किरण खानखोजे यांनी केले. 5 वी ते 10 वी गटातील विद्यार्थ्यांची कार्यशाळा व अंतिम फेरी घेण्यात आली. परीक्षक विराज सवाई व किरण खानखोजे यांनी कार्यशाळेत कल्पना चित्र शिकविताना कल्पनेचे मूर्त रेखाटन या विषयी मार्गर्दर्शन केले. परीक्षकांनी कार्यशाळेत शिकविलेल्या गोष्टींचा मुलांनी चित्र काढताना उपयोग केला याबद्दल समाधान व्यक्त केले. चिंचवडचे सुलेखन तज्ञ् नागराज मळशेट्टी यांनी अक्षर लेखन / कॅलिग्राफी या संबंधी मार्गदर्शन केले.

पारितोषिक वितरण रोटरीचे मनोज ढमाले, शाहीन शेख, रेश्मा फडतरे, सुनील महाजन व सीमा ढमाले यांचे हस्ते झाले. अध्यक्ष मनोज ढमाले व रेश्मा फडतरे यांनी कलापिनीच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन बाळ कलाकारांना प्रोत्साहन मिळत आहे याबद्दल आनंद व्यक्त केला व सुलेखन कार्यशाळेसारखे उपक्रम आयोजित करण्याची तयारी दर्शविली. डॉ अनंत परांजपे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धा संजोजक अशोक बकरे यांनी आभार मानले. स्पर्धेचे संयोजनात – मुकुंद इनामदार, रामचंद्र रानडे, रश्मी पांढरे, प्रतीक मेहता, चेतन शाह, अंजली सहस्रबुद्धे व बालभवन प्रशिक्षकांनी योगदान दिले.

स्पर्धेचा निकाल

बालगट: बालवाडी, ज्युनिअर/ सिनियर केजी

प्रथम- स्पृहा मखामले, जैन इंग्लिश स्कूल तळेगाव
द्वितीय- निखत शेख, पैसाफंड ब
तृतीय- (विभागून)आरव मेहता, माउंट सेंट ऍन, सक्षम वाळवी, सह्याद्री इंग्लिश स्कूल
उत्तेजनार्थ- कार बिरादार, कांतीलाल शाह विद्यालय, अन्वयी देशपांडे, बालविकास विद्यालय, पद्मजा कुलकर्णी, विश्वकर्मा Empros, आरोही वाजे, सह्याद्री इंग्लिश स्कूल, दुर्वा पोलावार, कलापिनी बालभवन, मुनमयी बटरफ्लाय स्कूल

शिशु गट: 1 ली, 2 री

प्रथम- धैर्य गोंधा, माउंट सेंट ऍन
द्वितीय- अभिश्री पेस्ट, Empros
तृतीय- (विभागून)अभिलाषा एरंडे, जैन इंग्लिश स्कूल व ओवी सावंत, माऊंट सेंट ऍन
उत्तेजनार्थ- समृद्धी भोईर – जैन इंग्लिश स्कूल, शुभश्री जाधव – डी वाय पाटील स्कूल आंबी, गौरी पोलावार – इंद्रायणी स्कूल, आर्या सुरवंशी-पोदार इंग्लिश स्कूल, इरा जोशी-इम्प्रोस स्कूल

लहान गट: 3 री, 4 थी

प्रथम- मनोमय देव-Empros स्कूल
द्वितीय- शार्वी जाजू-न्यू इंग्लिश स्कूल
तृतीय- इशा देशमुख- माऊंट सेंट ऍन
उत्तेजनार्थ- सार्थक बोबले-पैसे फंड शाळा, मनस्वी ठाकूर-सरस्वती विद्यामंदिर, स्वरांजली पाटील-पैसाफंड शाळा, आर्यन कुंभार-पैसाफंड शाळा, मयंक शिंगाडे-पैसाफंड शाळा, हिना नुटावल्ली-empros स्कूल, सौम्या शिंदे-माऊंट सेंट ऍन, अंकित समंथा-हचिंग स्कूल

मध्यम गट: 5 वी ते 7 वी

प्रथम- गणेश तेवाय-कांतीलाल शाह विद्यालय,
द्वितीय- आर्यन वाजे-माऊंट सेंट ऍन
तृतीय- सोहम चौधरी-
उत्तेजनार्थ- तेजस्विनी पारगे-कृष्णराव भेगडे स्कूल. वैष्णवी देवरे-डी वाय पाटील स्कूल आंबी, अर्जुन फलके-माऊंट सेंट ऍन, आंचल सिंग-जय वकील स्कूल, तनया खोल्लम-जय वकील स्कूल

मोठा गट: 8 वी ते 10 वी

प्रथम- तनिषा सरपाते-इंदिरा स्कूल
द्वितीय- आनंद गायकवाड-आदर्श विद्यामंदिर
तृतीय- सार्थकी सराफदार-माऊंट सेंट ऍन
उत्तेजनार्थ- रेणुका घोडके-अण्णासाहेब चौबे हायस्कूल, पूर्वी बाफना-माऊंट सेंट ऍन, आर्यन कदम-प्रज्ञानप्रबोधिनी, कोमल जाधव-माऊंट सेंट ऍन, आदित्य जंगम-भैरवनाथ विद्यालय बेबडे ओहोळ

खुला गट
प्रथम- दीपक राजपूत
द्वितीय- प्रेमलता मेश्राम
तृतीय-शारदा भागवत
उत्तेजनार्थ- अमृता दणाणे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.