Pimpri : राष्ट्रवादीच्या कामगार सेल अध्यक्षपदी किरण देशमुख यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कामगार सेलच्या अध्यक्षपदी किरण देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस संघटक, कामगार नेते अरुण बो-हाडे, महाराष्ट्र प्रदेश कामगार सेलचे अध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले, पक्षाचे प्रवक्ते फजल शेख, महमद पानसरे, विजय लोखंडे, लिगल सेलचे अध्यक्ष गोरक्ष लोखंडे, दत्तात्रय जगताप, कविता खराडे, निर्मला माने, मनिषा घटकळ, शिल्पा बिडकर उपस्थित होते.

“पिंपरी-चिंचवडची ओळख ही कामगारनगरी असल्याने कामगार हिताचे सर्व प्रश्न पक्षाच्या पुढाकारतून सोडवण्यासाठी कायम कटिबध्द व तत्पर राहीन. पक्षाने दिलेली ही जबाबदारी फार मोठी आहे. या उद्योगनगरीतील कामगाराच्या सर्वांगीण हितार्थ कटिबद्ध राहून “कामगार हिताय कामगार सुखाय” हे ब्रीद घेऊन सदैव कार्यरत राहीन” असे देशमुख यांनी निवडीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.